ajitpawar-chandrakantpatil 
पुणे

Exclusive:दोन्ही ‘दादां’समोर उभं राजकीय कसोटीचं वर्ष

संभाजी पाटील -सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘मेट्रो’वर स्वार होण्याच्या तयारीत असणारा भाजप आणि महाविकास आघाडीची मोट बांधून सत्तापरिवर्तनासाठी उत्सुक असणारी राष्ट्रवादी काँग्रेस यांची महापालिकेसाठीची होणारी रस्सीखेच यामुळे २०२१ हे वर्ष पुणेकरांसाठी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. केवळ २३ नवीन गावे महापालिकेच्या हद्दीत आली म्हणून पुण्यात सत्तापरिवर्तन होईल किंवा राजकीय समीकरणे बदलतील, असे मानायचे कारण नाही. 

पुणेकरांनी विचारपूर्वक भाजपला एक हाती सत्ता दिली. त्यातून त्यांना शहरात परिवर्तनाची अपेक्षा होती. या कसोटीवर भाजप किती खरा उतरला आणि पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे किती प्रश्‍न ते सोडवू शकले, हाच निकष २०२२ च्या महापालिका निवडणुकीतही असेल. त्यामुळे विकासकामांचा वेग भाजप किती वाढणार हे नव्या वर्षात महत्त्वाचे ठरेल. २३ गावांच्या समावेशामुळे बदलणारी प्रभाग रचना, बहू की द्विप्रभाग पद्धती, २०२२ पर्यंत विकास आघाडीचे असणारे स्वरूप, पक्षांतराचे भाजपसमोर असणारे आव्हान यामुळे २०२१ हे वर्षे पुणे शहरासाठी राजकीयदृष्ट्या सर्वांचीच कसोटी पाहणारे ठरणार आहे.

मेट्रो धावणार

  •   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेली पुणे मेट्रो या वर्षात धावणार
  •   भाजपच्या दृष्टीने मेट्रो हा प्रतिष्ठेचा विषय
  •   राज्य सरकारकडून पीएमआरडीएच्या मेट्रोसाठी प्रयत्न होतील.
  •   रिंगरोड आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गी लावण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असेल.

निवडणूक तयारीचे वर्ष

  •   फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेची निवडणूक आहे. पण निवडणुकीची तयारी आताच सुरू झाली आहे.
  •   कोरोनाचा विकास कामांना मोठा फटका.
  •   भामा आसखेडचे पाणी, पीएमपीएलच्या ताफ्यात नव्या बसगाड्या, प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण व बळकटीकरण या सत्ताधाऱ्यांच्या जमेच्या बाजू
  •   मेट्रोचे काम वगळता पुणेकरांना दिसेल असा एकही प्रकल्प मार्गी नाही.
  •   नदी सुधारणा, समान पाणी वाटप, समाविष्ट गावांमधील पायाभूत सुविधा, बीआरटी आदी प्रकल्प प्रलंबित
  •   विधानसभा निवडणुकीत पुण्यातील दोन मतदारसंघात झालेल्या पराभवामुळे वडगावशेरी, हडपसर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली.

२३ गावांच्या विकासाचे आव्हान

  1.   २३ गावांचा समावेश झाल्याने नगरसेवकांची संख्या १६४ वरून १८५ वर पोहोचणार
  2.   वीस जागा वाढल्याने निकालावर परिणाम शक्‍य
  3.   गावांसाठी विकासनिधी कुठून येणार हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार
  4.   नव्या वर्षात या गावांना महापालिकेकडून येणारा अनुभव महत्त्वाचा ठरणार

प्रभागरचना ठरेल निर्णायक

  1.   प्रभाग रचना नव्या वर्षात होणार, यात राजकीय हस्तक्षेप टाळणे हे आव्हान
  2.   प्रभाग रचना करताना महापालिका विरुद्ध राज्य सरकार अशा संघर्षाची शक्‍यता
  3.   दोन सदस्यांचा प्रभाग होण्याची शक्‍यता. आघाडीतील काही पक्षांना सिंगल प्रभाग हवा.
  4.   प्रभाग पद्धतीवर नजर ठेवून शेवट्या वर्षात विकासकामांचा विद्यमानांचा भर राहणार

महाविकास आघाडी महापालिकेत राहणार काय?

  •   महाविकास आघाडी म्हणून लढलो तर भाजपचा पराभव करू शकतो, याचा आघाडीला आत्मविश्‍वास
  •   मुंबई महापालिकेत काय होणार, यावर पुण्यासह राज्यातील इतर शहरात आघाडीचा निर्णय
  •   पुण्यात आघाडी म्हणून लढण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनाही इच्छुक
  •   जागा वाटपावरून वाद होण्याची शक्‍यता असल्याने भाजप सावध पवित्र्यात
  •   भाजप पुण्यात आरपीआयला सोबत ठेवणार

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लढत दादा-दादांमध्ये

  •   पुणे भाजपचे नेतृत्व आतापर्यंत खासदार गिरीश बापट यांच्याकडेच होते, पण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यातून आमदार झाल्याने त्यांचा प्रभाव
  •   खासदार बापट आणि चंद्रकांतदादा यांचे सूर किती जुळणार हेही महत्त्वाचे ठरणार
  •   पालकमंत्री अजित पवार पुणे आणि पिंपरी-चिंचवड ताब्यात घेण्यास उत्सुक. त्यामुळे अजितदादा- चंद्रकांतदादा सामना रंगणार
  •   २०१७ मध्ये विविध पक्षातून भाजपमध्ये आलेले याच पक्षात कायम राहतील, हे भाजपसमोर आव्हान असेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT